25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिस्तमस साजरा केला जात आहे.
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आपल्या कुटुंबासोबत ख्रिस्तमस साजरा केला.
ख्रिस्तमस निमित्ताने धोनी आपल्या लाडक्या लेकीसाठी सांताक्लॉज बनला होता.
एम एस धोनीची पत्नी साक्षी हिने सोशल मीडियावर ख्रिस्तमस सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले.
सांताक्लॉज म्हणून धोनीने लेक झिवा आणि कुटुंबातील व्यक्तींना अनेक भेट वस्तू दिल्या.
सुरुवातीला फोटो पाहिल्यावर सांताक्लॉजच्या रूपात धोनीला ओळखणे फॅन्सना कठीण गेले मात्र टोपीवर लिहिलेल्या 'माही' या नावावरून सर्वांनी त्याला बरोबर ओळखले.