मार्केटमध्ये 'या' 7 सीटर कारचा धुमाकूळ, तब्बल 1 वर्षाचं वेटिंग

भारतीय बाजारपेठेत चांगला स्पेस आणि जास्त आसनक्षमता असणाऱ्या गाड्यांची नेहमीच मागणी असते. यामध्ये एमपीव्ही गाड्या सर्वोत्तम मानल्या जातात.

टाटा इनोव्हाचा दबदबा

भारतातं एमपीव्ही सेगमेंट फार मोठं नाही. पण काही गाड्यांचा गेल्या अनेक दशकांपासून मार्केटमध्ये दबदबा आहे. टाटा इनोव्हा ही त्यातीलच एक कार आहे. कंपनीने नुकतंच Innova Hycross ला लाँच केलं होतं.

वेटिंग पीरियड 1 वर्षापर्यंत

डिसेंबर 2022 मध्ये बाजारात आल्यापासूनच ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. रिपोर्टनुसार, याच्या काही व्हेरियंट्सचा वेटिंग पीरियड 1 वर्षापर्यंत पोहोचला आहे.

VX आणि VX (O) चा वेटिंग पीरियड 9 ते 12 महिने

Hycross Hybrid एकूण चार व्हेरियंट्समध्ये येते. दरम्यान कंपनीने याच्या टॉप स्पेक्स व्हेरियंट ZX ची बुकिंग थोड्या दिवसांसाठी थांबवली होती. याशिवाय VX आणि VX (O) चा वेटिंग पीरियडही 9 ते 12 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.

पेट्रोल व्हेरियंटलाही मागणी

याच्या पेट्रोल व्हेरियंटलाही फार मागणी आहे. याच्या G आणि GX व्हेरियंटची डिलिव्हरीसाठी ग्राहकांना तब्बल 4 ते 6 महिने वाट पाहावी लागत आहे.

अॅडव्हान्स फिचर्स आणि तंत्रज्ञान

Innova Hycross अनेक गोष्टींमुळे खास आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

फिचर्स

नव्या Innova Hycross Toyota मध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, थ्री पॉइंट सीटबेल्ट, ईबीडीसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रेअर पार्किंग कॅमेरा यासह अन्य गोष्टी आहेत.

किंमत किती?

Innova Hycross 7 आणि 8 सीटर कॉन्फिगरेशनसह येते. हिची किंमत 18.82 लाख आणि 30.26 लाख आहे.

VIEW ALL

Read Next Story