स्मार्टफोन सध्या आपल्याला आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन वापरात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. बँकेच्या कामांपासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व कामं मोबाईलवर होऊ लागली आहेत.
दैनंदित आयुष्यात मोबाईलचा वापर वाढल्याने स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी काही जण मोबाईल सारखा चार्जिंगला लावतात.
काहीजण रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत स्मार्टफोन चार्जिंगला लावतात. पण असं करणं मोबाईलच्या बॅटरीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्टफोनमधली लिथियम-आयन बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग असणं सेफ मानलं जातं.
लिथियम-आयन बॅटरी सतत 20 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज असणं योग्य नाही.
लिथियम-आयन बॅटरीत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन इलेक्ट्रोड असतात. यांना जास्त चार्ज केलं तर बॅटरीची लाईफ कमी होत जाते.
100 टक्के मोबाईल चार्ज झाल्यास पॉवर सप्लाय बंद करा. पण महिन्यातून एकदाच मोबाईल शंभर टक्के चार्ज करा. सारखा 100 टक्के चार्ज केल्यास मोबाईल खराब होऊ शकतो.