एकदा खरेदी केलेला स्मार्टफोन जेव्हा तुम्ही विकायला जाता तेव्हा त्या रिसेल मोबाईलची किंमत ही मूळ किंमतीच्या अर्धीसुद्धा दिली जात नाही.
इतर गॅजेट्सच्या प्रमाणात स्मार्टफोनचे आयुष्य हे कमी असते. याच मुख्य कारणामुळे स्मार्टफोन विकायला गेल्यास त्याची अर्धी किंमत ही दिली जात नाही.
अशावेळेस तुम्ही योग्य वेळेत योग्य प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन विकणे गरजेचे आहे. जिथे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर चांगला मोबदला दिला जाईल.
आधी तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींना विकण्यास प्रयत्न करा. अन्यथा तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉमवरुन ही स्मार्टफोन रिसेल करु शकता.
हे करताना मात्र तुमच्या फोनला कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेलं नसलं पाहिजे. तुमचा स्मार्टफोन क्लिन असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला स्मार्टफोनचा चांगला मोबदला मिळेल.
तुमच्याजवळ तुमच्या स्मार्टफोनचा ओरिजनल चार्जर असणे ही अपेक्षित आहे अशावेळेस तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची चांगली किंमत मिळेल.