सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर शुभमन गिल आणि अभिनेत्री फातिमा सनाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय.

शुभमन गिल आणि फातिमा सनाचा चेहरा अगदी मिळताजुळता असल्याचं या फोटोतून दिसतोय.

दंगल चित्रपटातील फातिमा सनाचा लूक हुबेहुब शुभमन गिल सारखा दिसतोय, आता या व्हायरल फोटोवर फातिमाने प्रतिक्रिया दिली आहे.

हा फोटो आपण पाहिला, तो फोटो खूप फनी असल्याचं फातिमाने म्हटलंय, हा फोटो अनेक मित्रांनी आपल्याला टॅग केल्याचंह फातिमाने सांगितलं.

पण केवळ शुभमन गिलच नाही तर अनेकांबरोबर आपली तुलना याआधीही करण्यात आल्याचं फातिमाने सांगितलं.

याआधी फातिमाची तुलना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि अभिनेत्री कतरीना कैफबरोबरही करण्यात आली होती.

दंगल या चित्रपटातून फातिमा सनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटातील तिच्या भूमिकेचं भरपूर कौतुकही झालं.

VIEW ALL

Read Next Story