विक्रांत मेसीची पत्नी अभिनेत्री शीतल ठाकूर सध्या तिच्या प्रेग्नंसीचा खूप आनंद घेत आहे.

नुकतेच या कपलने बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शीतल ठाकूरने तिच्या इंस्टाग्रामवर बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी शीतल हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.

गोल्ड इयरिंग्ससह तिने तिचा लूक पूर्ण केला. शीतलच्या बेबी शॉवर केकची एक झलक देखील तिने शेअर केली आहे जी जंगल थीमने प्रेरित आहे.

एका फोटोमध्ये शीतल एका मित्रासोबत तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे आणि तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आयुष्य अधिक गोड होणार आहे. माझं बेबी शॉवर

विक्रांत मेसी आणि शीतला ठाकूर त्यांच्या पहिल्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत.

या जोडप्याने फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केलं.

VIEW ALL

Read Next Story