अँड्रॉइड मोबाइल अॅप मार्केटमध्ये गुगल प्ले स्टोअरला वर्चस्वाशी संबंधित अविश्वास खटल्याचा सामना करावा लागला आहे. गुगलने मक्तेदारी निर्माण करण्यासाठी त्याच्या नियंत्रणाचा गैरफायदा घेतला, त्यामुळे ग्राहकांना अधिकची किंमत भरावी लागली.

या खटल्याचा निपटारा करण्यासाठी, गुगलने 700 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे. ज्यापैकी 630 दशलक्ष डॉलर म्हणजेच 5238 कोटी रुपये ग्राहकांना दिले जातील.

बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगलच्या या वृत्तीमुळे ज्या ग्राहकांना जास्त किंमतींचा सामना करावा लागला असेल त्यांना भरपाई म्हणून 630 दशलक्ष डॉलर (रु. 5238 कोटी) मिळणार आहे.

या खटल्याशी संबंधित वकिलांचा अंदाज आहे की अंदाजे 102 दशलक्ष (म्हणजे 10.2 कोटी) लोक या सेटलमेंट रकमेचा एक भाग प्राप्त करण्यास पात्र असू शकतात.

सुमारे 70 टक्के, जे सुमारे 71.4 दशलक्ष (71.4 कोटी) लोकांच्या समतुल्य आहेत, त्यांना भरपाई मिळू शकते. या व्यक्तींना पेमेंटच्या त्यांच्या वाट्याचा दावा करण्यासाठी कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही गुगलचे युजर असाल किंवा खटल्यामध्ये समाविष्ट असलेल्या कालावधीत गुगल प्लेद्वारे अॅप्स खरेदी केले असल्यास, तुम्ही या रकमेसाठी पात्र असू शकता.

तसेस दावा न करताही तुम्ही 630 दशलक्ष डॉलरच्या पेआउटच्या भागासाठी पात्र असाल. पात्रता आणि वितरण प्रक्रियेचे तपशील न्यायालय किंवा सेटलमेंट प्रशासकाद्वारे स्पष्ट केले जातील.

जर तुम्ही गुगल प्लेद्वारे 16 ऑगस्ट 2016 आणि 30 डिसेंबर 2023 रोजी कोणतेही अॅप खरेदी केले असतील तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. तुमचा पत्ता खटल्याशी संबधित 50 पैकी कोणत्याही राज्यातील असल्यास ही भरपाई मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story