केळी या फळाला सुपरफ्रूट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यात शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्व आहेत.

केळी खाणं हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांनाही फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही रोज केळी खाण्याचा सल्ला देतात.

केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध असते. त्यामुळे केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

हिंवाळ्यात केळी खाण्याबाबत अनेक भ्रम आहेत. थंडीच्या दिवसात केळी खाल्याने सर्दी होते असं आपण नेहमी ऐकतो

केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटेशियम असतं. त्यामुळे थंडियाच्या दिवसात केळी खाण्याने कोणताही त्रास होत नाही

जे पाणी कमी पितात त्यांच्यासाठी केळी खाणं उपयुक्त ठरू शकतं. केळी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात

केळ्यात असलेली इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्याच्या दिवसांत केळी खाणे खूप महत्त्वाचे आहे.

VIEW ALL

Read Next Story