सोलार पॅनल लावा लाईट बिलची चिंता सोडा! सरकारच देतंय घसघशीत अनुदान

ही नेमकी योजना काय? कोणाला किती पैसे मिळतात? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Swapnil Ghangale
Jun 11,2023

लाईट बिल पूर्णपणे टाळू शकता

घराच्या छप्परावर सोलर पॅनल लावून तुम्ही लाईट बिल पूर्णपणे टाळू शकता किंवा त्यात कपात करु शकता.

वाढत्या लाईट बिलवर उत्तम पर्याय

सोलर पॅनल खरोखरच तुमच्या वाढत्या लाईट बिलवर उत्तम पर्याय ठरु शकतात.

हरित ऊर्जा मोहिमेअंतर्गत सुरु केली योजना

सरकारने ग्रीन एनर्जी म्हणजेच हरित ऊर्जा मोहिमेअंतर्गत सोलर पॅनलसंदर्भात 'रूफटॉप सोलर' योजना सुरु केली आहे.

मोठ्या प्रमाणात अनुदान देते सरकार

'रूफटॉप सोलर' योजनेअंतर्गत घराच्या छप्परावर सोलर पॅनल लावणाऱ्यांना सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान म्हणजेच सबसिडी देतं.

याच विक्रेत्यांकडून घ्यावे पॅनल

सोलर पॅनलवर सबसिडी मिळवायची असेल तर डिस्कॉम पॅनलमध्ये सहभागी असलेल्या विक्रेत्यांकडून सोलर पॅनल लावून घेणं आवश्यक असते.

25 वर्ष करता येतो वापर

सोलर पॅनल एकदा लावल्यानंतर पुढील 25 वर्ष ते वापरता येतं.

दिर्घकालीन गुंतवणूक

त्यामुळेच सोलर पॅनलवर एकदा खर्च केल्यास ही दिर्घकालीन गुंतवणूक ठरु शकते कारण यामुळे लाइटचं बिल फार कमी होतं.

...तर मिळेल 40 टक्के अनुदान

3 किलोव्हॅटपर्यंत रूफटॉप सोलर पॅनल लावले तर सरकार 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देते.

सरकार 20 टक्क्यांपर्यंत अनुदान

10 किलोव्हॅटपर्यंत रूफटॉप सोलर पॅनल लावले तर सरकार 20 टक्क्यांपर्यंत अनुदान देते.

1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च

2 किलोव्हॅटच्या सोलर पॅनल घराच्या छतावर लावलं तर जवळजवळ 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च येईल.

सरकारकडून किती अनुदान मिळणार?

यापैकी 72 हजार रुपये खर्च सोलर पॅनल लावणाऱ्याला करावा लागेल. बाकी 48 हजार रुपये सरकारकडून अनुदान मिळेल.

VIEW ALL

Read Next Story