तुम्हालाही पाहिजेत मजबूत आणि लांब केस मग 'हे' आहेत Best Hair Oil

लांब, रेशमी केसांचं रहस्य

तुम्हाला पण लांब आणि रेशमी केसं हवे असतील तर तेलाची मालिश करणं खूप महत्त्वाचं असते.

कोणतं हेअर ऑइल निवडावं

बऱ्याचवेळा आपल्याला केसांना लावायला कोणतं तेल वापराव हे कळत नाही अशा परिस्थितीत काय करायला हवं हे जाणून घेऊया...

भृंगराज

भृंगराजमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्याचं तेल हे आपल्या केसांना मजबुत करत आणि त्यासोबतच केसांची वाढ ही होते.

कसं लावाल तेल

भृंगराज तेल आधी गरम करून घ्या आणि कोमट झाल्यानंतर तुमच्या टाळूवर मसाज करा. मग थोड्यावेळात शॅम्पूनं केस धुवा. केसांचा कोरडेपणा आणि कोंडा होईल कमी.

तीळाचे तेल

तिळाचे तेल केसांना लावतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तिळाचं तेल लावलं तर त्यानं केसांचा कोरडेपणा कमी होतो. कस रेशमी आणि दाट होतात.

तिळाच्या तेलाचे फायदे

तिळात ओमेगा-3, ओमेगा-3 आणि ओमेगा-9 चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते आणि केस मजबूत, रेशमी आणि घट्ट होतात. इतकेच नाही तर केसांच्या वाढीसही मदत होते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑईल केसांना लावल्यास त्याचा नक्कीच खूप फायदा होतो. केसांतील कोरडेपणा कमी होतो. केस मजबुत होतात.

ऑलिव्ह ऑइल लावण्याची पद्धत

अंड्याचा पांढरा भाग आणि मधामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळा. त्यानंतर हे तेल केसांना लावा आणि वीस मिनिटांनंतर शॅम्पूनं धुवून काढा. यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या दूर होते.

बदाम तेल

बदामाच्या तेलात ओमेगा-3, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. केस मजबूत, दाट आणि लांब बनवण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. आठवड्यातून किमान दोनदा बदामाच्या तेलाने मसाज करा. केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत तेल लावा. कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story