कोणत्या स्कूटवर किती सूट आहे जाणून घ्या सविस्तर माहिती
दिवाळीनिमित्त दिल्या जात असलेल्या या सवलतींमुळे महागड्या इलेक्ट्रीक स्कूटर्स अगदीच स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. पाहूयात कोणत्या स्कूटरवर किती ऑफ आहे.
ओला एस 1 एअर, एस 1 प्लस आणि एस 1 प्रोवर सूट देण्यात आली आहे.
एस 1 एअरवर 2 हजार फेस्टिव्हल डिस्काऊंट, 5 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 7500 रुपये फाइनॅनशिएल बेनिफिट दिला आहे. म्हणजेच एकूण सूट 14500 रुपयांची आहे.
ओला एस 1 एअरची एक्स शोरुम प्राइज 1.05 लाख रुपये आहे.
एस 1 एक्स प्लसवर कंपनीने 17500 रुपये सूट देण्यात आली आहे.
एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 151 किलोमीटरपर्यंत धावते.
'एस 1 प्रो'वर कंपनीने 19500 रुपयांची सूट दिली आहे.
एथर एनर्जीनेही स्कूटरवर मोठी सूट दिली आहे. एथर 450 एक्स आणि 450 एस व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. सूट ग्राह्य धरल्यास सव्वा लाखांची गाडी केवळ 85 हजारांना मिळेल.
एथर 450 प्रो मॉडेलवर 1500 रुपयांचं कॉर्परेट डिस्काऊंटही देण्यात आलं आहे.
एथर कंपनी 2 वर्षांसाठी कर्जाची सुविधाही देत असून हे कर्ज 5.99 टक्क्यांनी दिलं जात आहे.
दोन्ही कंपन्यांनी दिलेली ही सूट 15 नोव्हेंबरपर्यंत गाडी बूक करणाऱ्यांसाठी असेल.