जबरदस्त! गाईच्या शेणावर धावणारी कार; बाजारात आला WagonR चा CBG अवतार

Maruti Wagon-R CBG

मारुती सुझुकीची पालक कंपनी सुझुकीने Wagon-R ला जपानमधील मोबिलिटी शोमध्ये एका नव्या अवतारात सादर केलं आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे, ही कार कॉम्प्रेस्ड बायोमेथेन गॅसवर (CBG) धावते.

G7 समिटमध्ये सादर

2022 मध्ये मारुती सुझुकी इंडियाने या कारला डेव्हलप केलं होतं. तसंच मे महिन्यात जपानच्या हिरोशिमा शहरात आयोजित G7 समिटमध्ये सादर करण्यात आलं होतं.

Wagon-R Flex Fuel मॉडेल

मारुती सुझुकी कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने काम करत आहे. कंपनीने या कारला Wagon-R Flex Fuel मॉडेलसह विकसित केलं होतं.

इतर इंधनांवरही लक्ष्य केंद्रीत करणं गरजेचं

देशाला फक्त इलेक्ट्रिक गाड्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. सीएनजी,सीबीजी, हायब्रीड अशा इतर इंधनांवरही लक्ष्य केंद्रीत करणं गरजेचं आहे असं मारुती सुझुकीचे चेअरमन आर सी भार्गव म्हणाले होते.

CBG म्हणजे काय असतं?

सीबीजी हे सेंद्रिय पदार्थ जसे की कृषी कचरा, सांडपाणी, शेण इत्यादींच्या विघटनापासून बनवले जाते.

शुद्धीकरण

CBG तयार करण्यासाठी, विघटन प्रक्रियेतून प्राप्त होणारा बायोगॅस कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक शुद्धीकरणातून जातो.

प्रक्रिया

या प्रक्रियेमुळे गॅसमधील मिथेनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे ते इंटर्नल कम्ब्युशन इंजिनला (ICE) पॉवर किंवा एनर्जी देण्यासाठी उपयुक्त होतं. यामुळे कारचं इंजिन चालतं आणि त्याचा खर्चही कमी असतो.

इथेनॉल-पेट्रोल मिश्रण

मारुती सुझुकीने ऑटो-एक्सोमध्ये फ्लेस्क-फ्युएल Wagon-R प्रोटोटाइप सादर केलं होतं, जी 20 ते 85 टक्क्यांदरम्यान इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर धावते.

इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त इतर पर्यांय

मारुती सुझुकी इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त इतर पर्यांयाचाही विचार करत आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीने आपला सीएनजी पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.

कधी होणार लाँच?

पण कंपनीने Maruti Wagon-R CBG ला विक्रीसाठी बाजारात कधी सादर करणार आहे याची अधिकृत माहिती दिलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story