भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यातही खासकरुन दुचाकी सेगमेंटमध्ये रोज नवे ब्रँड्स येत आहेत. अनेक स्टार्टअप कंपन्याही या स्पर्धेत आहेत.
कोमाकीची सहकारी ब्रँड इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप mXmoto ने आपली पहिली इलेक्ट्रिक दुचाकी mX9 ला अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे.
आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या दुचाकीची किंमत 1.46 लाख (Ex Showroom) आहे.
या बाईकमध्ये LED डीआरएल, LED टर्न इंडिकेटर्स आणि ब्रेकसह एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत.
कंपनीचा दावा आहे की, ही बाईक सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत धावेल. दोन रंगात ही बाईक उपलब्ध आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, mX9 मध्ये 3.2kWh च्या क्षमतेचा LIPO4 बॅटरी पॅक मिळतो. ही बॅटरी 120 ते 140 किमीची रेंज देते.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कंपनीने 4000 वॉटच्या क्षमतेची हब मोटर दिली आहे. जी 148 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
mXmoto ने आपल्या या बाईकमध्ये 17 इंचाच्या व्हिलचा वापर केला आहे.
बाईकमध्ये नॅव्हिगेशनसह एक टीएफटी स्क्रीन, अॅप इंटिग्रेशन यासह साऊंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट, एंटी स्किड\हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट यांचा सहभाग ाहे.
या बाईकच्या बॅटरीला पूर्णपणे चार्जिंग करण्यासाठी जवळपास 4 तासांचा वेळ लागतो. याचा टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे.
रेसिंग बाईकप्रमाणे या बाईकमध्ये मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, याची एनर्जी सेव्हिंग टेक्नॉलॉजी आऊटपूटमध्ये 16 टक्के वाढ करते.
कंपनीचा दावा आहे की, बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 1.5 युनिट वीज लागेल.