ChatGPT

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ChatGPT च्या तंत्रज्ञानाचाही वापर आता या कारमध्ये होताना दिसणार आहे.

एकट्यानंच प्रवास करताय?

थोडक्यात तुम्ही जर कारनं एकटेच प्रवास करत असाल तरीही तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण, तुमचं ऐकायला आणि तुमच्याशी बोलायला AI तत्पर असणार आहे.

Mercedes-Benz

Mercedes-Benz या जगविख्यात कार निर्मात्या कंपनीकडून वाहनांमध्ये येत्या काळात ChatGPT चं तंत्रज्ञान वापरात आणलं जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

नवी क्रांती

चॅट जीपीटीचा वापर करून ऑटो क्षेत्रातील ही नवी क्रांती घडवणारी मर्सिडीज बेन्झ ही पहिलीच कार कंपनी ठरत आहे.

सॉफ्टवेयर अपडेट

प्राथमिक स्तरावर अमेरिकेत मर्सिडीजच्या 900,000 कारमध्ये बीटा प्रोग्रामअंतर्गत ChatGPT सुरु करण्यात आलं आहे. सॉफ्टवेयर अपडेट करून आता या सुविधेचा आनंद घेता येईल.

Hey Mercedes...

ChatGPT चा वापर करण्यासाठी आता युजर्सना “Hey Mercedes” अशी कमांडही द्यावी लागणार आहे.

एकटेपणाचा वैताग आला?

थोडक्यात तुम्ही एकटेच लांबच्या प्रवासाला निघालात आणि तिथंही तुम्हाला एकटेपणाचा वैताग आला, गाणीही ऐकायची नाहीयेत अशी वेळ आली तर तुम्ही चक्क “Hey Mercedes” म्हणत चॅट जीपीटीशी संवाद साधू शकता.

अफलातून अनुभव

हा अनुभव इतका अफलातून असेल की या माध्यमातून तुम्ही AI ला एखादं पुस्तक वाचायला सांगू शकता किंवा गहन विषयावर चर्चाही करू शकता. वॉईस अससिस्टंसच्या मदतीनं तुम्ही इथं प्रवासासंबंधीचे प्रश्न, पाककृती, प्रेमाच्या नात्यासाठी Tips हे आणि असे अनेक प्रश्न विचारू शकता.

तुम्ही कधी वापरताय?

Mercedes-Benz अॅपमध्येही हा प्रोग्राम उबलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात इतरही कार कंपन्या हे तंत्रज्ञान वापरात आणत ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्यावर भर देतील.

VIEW ALL

Read Next Story