'या' 5 कंपन्यांचा 1 शेअर घेण्यासाठी महिन्याचा पगारही पडेल कमी

तुम्हाला शेअर मार्केटमधील सर्वात महागडे 5 शेअर्स कोणते आहेत ठाऊक आहे का?

एमआरएफचा नवा विक्रम

जगातील प्रसिद्ध टायर कंपनी असलेल्या एमआरएफच्या शेअर्सनं एक नवा विक्रम मागील आठवड्यात केला.

एमआरफच्या शेअर्सची किंमत लाखावर गेली

13 जून रोजी एमआरफच्या शेअर्सची किंमत प्रती शेअर 1 लाखांच्या वर गेली.

पहिल्यांदाच असं झालं

भारतीय शेअर बाजारामध्ये कोणत्याही कंपनीच्या एका शेअरची किंमत 1 लाखांपर्यंत पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

एमआरएफच्या एका शेअरची किंमत किती?

13 जून रोजी एमआरएफच्या एका शेअरसाठी तब्बल 1 लाख 150 हजार रुपये मोजावे लागत होते.

महागड्या शेअर्समध्ये केवळ एमआरएफच नाही

मात्र अशाप्रकारे सर्वात महागड्या शेअर्समध्ये केवळ एमआरफचाच क्रमांक लागतो असं नाही.

टॉप पाचमध्ये इतर कंपन्या कोणत्या?

भारतीय शेअर बाजारामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत त्यांच्या एका शेअरसाठी तुम्हाला महिन्याभराचा पगार खर्च करावा लागेल. हे शेअर्स कोणते पाहूयात...

दुसरा सर्वात महागडा शेअर

सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीमध्ये एमआरएफ खालोखाल क्रमांक लागतो तो 'हनीवेल ऑटोमेशन इंडिया' या कंपनीचा.

'हनीवेल ऑटोमेशन इंडिया'च्या एका शेअरची किंमत

मागील आठवड्यामध्ये 'हनीवेल ऑटोमेशन इंडिया'च्या एका शेअरची किंमत 42 हजार 43 रुपये इतकी होती.

तिसरी सर्वात मोठी कंपनी 'पेज इंडस्ट्रीज'

भारतीय शेअर बाजारामधील सर्वात महाग शेअर्सच्या यादीमध्ये तिसरी कंपनी आहे 'पेज इंडस्ट्रीज'.

'पेज इंडस्ट्रीज'चा एक शेअर कितीला?

'पेज इंडस्ट्रीज'चा एक शेअर मागील आठवड्यात 38 हजार 622 रुपयांना विकत घेता येत होता.

टॉप चारमध्ये 'थ्री एम इंडिया'चा समावेश

सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीत टॉप फोरमध्ये 'थ्री एम इंडिया' या कंपनीचा क्रमांक लागतो.

'थ्री एम इंडिया'चा एक शेअर कितीला?

'थ्री एम इंडिया'चा एक शेअर खरेदी करण्यासाठी 27 हजार 767 रुपये खर्च करावे लागत होते.

पाचवा सर्वात महागडा शेअर्स

सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी 'श्री सिमेंट' ही कंपनी आहे.

'श्री सिमेंट'चा एक शेअर

'श्री सिमेंट'चा एक शेअर 26 हजार 67 रुपयांना उपलब्ध होता.

आकडेवारी 15 जूनची

वरील शेअर्सच्या किंमतीची सर्व आकडेवारी ही 15 जून 2023 च्या दरांप्रमाणे आहे.

VIEW ALL

Read Next Story