तुम्हीदेखील कमी किंमतीत दमदार फिचर्सची फॅमिली कार शोधताय का?
मारुती सुझुकी आपली नवीन स्विफ्ट हॅचबॅक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीने गेल्या वर्षी टोकियो मोटर शोमध्ये ही कार लॉन्च केली होती. दमदार फिचर्सची ही कार अवघ्या 6 लखात मिळण्याची शक्यता आहे.
कंपनी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम (ADAS) आणि 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत.
या कारमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, डीआरएल, फ्लोटिंग टाईप रूफ, ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि क्लिअर लेन्स टेललॅम्प हे फिचर्स असतील.
कार आतूनही अतिशय सुंदर आणि कार्यक्षम आहे. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि ADAS तंत्रज्ञान आहे.
भारतात, ADAS आणि 6 एअरबॅग फक्त टॉप व्हेरियंटमध्येच मिळतील अशी शक्यता आहे.
नवीन स्विफ्टच्या जपानी वर्जनमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड Z सीरीज पेट्रोल इंजिन आहे. ज्यात सौम्य हायब्रिड तंत्रज्ञान असेल.
ही कार भारतातही या इंजिनसह येऊ शकते, अशी शक्यता आहे.