चेहऱ्यावर स्टिम घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेण गरजेचं अस्तं.

तर अनेकदा तुम्ही पार्लरमध्ये फेशियल करताना चेहऱ्याला स्टिम म्हणजेच वाफ घेतात. काही जण घरी देखील गरम पाण्यामध्ये लिंबू, कडुनिंब टाकून स्टिम घेतात.

स्टिम घेणं हे चेहऱ्यासाठी चांगलं आहे हे अनेकांना ठाऊक असतं. यासाठीच स्किन केअर रुटीनमध्ये अनेकजण घरीदेखील स्टिम घेतात. मात्र स्टिम घेण्यामागचं वैज्ञानिक कारणं तुम्हाला ठाऊन नसेल. तेव्हा जाणून घेऊया नेमकी स्टीम कशी घ्यावी आणि त्याचे वैज्ञानिक फायदे.

क्लिंजिंग - नियमितपणे वाफ घेतल्याने त्वचेवरील पोर्स म्हणजेच छिद्र खुली होत असल्याने त्यातील घाण तसचं डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. ज्यांच्या चेहऱ्यावर ब्लकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या आहे त्यांना स्टीम घेण्याचा अधिक फायदा होवू शकतो.

स्किन हायड्रेट होण्यास मदत - अनेकदा शरीरातील पाणी कमी झाल्याने चेहऱ्याची त्वचा डिहायड्रेट होते. स्टीम घेतल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसचं यामुळे त्वचेवर चमकही येते.

त्वचा तरुण राहण्यास मदत - चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने त्वचेत कोलेजन आणि इलास्टिनचं उत्पादन वाढू लागतं. यामुळे चेहरा तरुण आणि चमकदार दिसू लागतो. यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा वाफ घ्यावी.

सुरकुत्या कमी होतील - स्टीम घेतल्याने गरम वाफेमुळे त्वचेतील रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

पिंपल्सची समस्या होते दूर - वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील पोअर्स उघडे झाल्याने त्यातील अतिरिक्त सीबम आणि घाण निधून जाते. यामुळे पिंपल्सची समस्या हळू हळू कमी होऊ लागते.

VIEW ALL

Read Next Story