लक्झरी कार सारखी फिलिंग

महिंद्रा ही दिग्गज कार निर्माता कंपनी आहे. विशेष म्हणजे महिंद्राकडे सर्वाधिक SUV आहेत. महिंद्रा महिन्याकाठी एक्सयूवी 300 पासून ते थार आणि स्कॉर्पियो सारख्या SUV गाड्यांची विक्री करते. मात्र, तुम्हाला माहित आहे का, महिंद्राकडे एकमेव MPV कार आहे. ही कार 7 आणि 8 सीटरमध्ये येते. या कारचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास यात लक्झरी कार सारखी फिलिंग येते. स्पेसही खूप आहे. तुम्ही ही कार 13 लाखांत खरेदी करू शकतात.

रूफ माउंटेड रिअर एसी

Mahindra Marazzo MPV ही टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि रूफ माउंटेड रिअर एसीने अद्ययावत आहे. फीचर्स लिस्टमध्ये डिस्क ब्रेक, 17 इंच अलॉय व्हील, रिअर व्यू कॅमेरा, बेस्ट इन क्लास स्पेस, 1055 लीटरचा बूट स्पेस, फ्रंट व्हील ड्राइव्ह, इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग देण्यात आला आहे.

भारतातील सर्वात सुरक्षित MPV कार

महिंद्रा कंपनी दावा केला आहे, की Mahindra Marazzo ही भारतातील सर्वात सुरक्षित MPV कार आहे. कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहेत.शार्क माशाने प्रेरित होऊन Marazzo MPV डिझाइन करण्यात आली आहे. कारमध्ये शार्क-टेलसारखे टेल लॅम्प देण्यात आले आहेत. कारची लांबी 4,585mm, रुंदी 1,866mm आणि उंची 1,774mm आहे. कारची व्हीलबेस 2,760mm असून 5.25-मीटरच्या टर्निंग रेडिएसमध्ये येतात.

कंपनी देत आहे खास ऑफर...

कंपनी सध्या या कारवर खास ऑफर देत आहे. कारवर 3 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वारंटी दिली जात आहे. विशेष म्हणजे कारला प्रति किलोमीटर केवळ 58 पैसे खर्च येतो, असा दावा महिंद्रानं केला आहे. सेफ्टीसाठी यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सोबत ABS, डिस्क ब्रेक, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, मागील डोअरला चाइल्ड सेफ्टी लॉक, इम्पॅक्ट सेंसिंग ऑटो डोअर लॉक आणि इंजिन इमोबिलाइझर देण्यात आलं आहे.

Mahindra Marazzo तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध

Mahindra Marazzo MPV असं या कारचं नाव आहे.या कारची किंमत 13.70 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप एंड मॉडेलची किंमत 16.02 लाख रुपये आहे. Mahindra Marazzo MPV तीन व्हेरिएंट्स M2, M4 Plus आणि M6 Plus मध्ये उपलब्ध आहे. सर्व व्हेरिएंट 7 आणि 8 सीटरमध्ये उपलब्ध असून 5 कलर ऑप्शनमध्ये येतात.

VIEW ALL

Read Next Story