एकूण 16 देशांनी स्वीकारलं भारताचं UPI; पाहा या 16 देशांची यादी

भारतामधील ही डिजीटल पेमेंट सिस्टीम जगभरात प्रसिद्ध आहे, या यादीतील नावं पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

2017 पासून युपीआयचा वापर

मागील 6 वर्षांपासून म्हणजेच 2017 पासून युपीआय म्हणजेच युनायटेड पेमेंट्स इटरफेस सेवा भारतामध्ये वापरली जाते.

ऑनलाइन व्यवहारांना चालना

युपीआय पेमेंटमुळे भारतामधील ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे फक्त केवळ भारत नाही तर इङझतर देशांनाही आता युपीआयचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.

फ्रान्समध्ये भारतीय चलन वापरण्याचीही चर्चा

फ्रान्समध्येही आता युपीआयबरोबरच भारतीय चलनाचाही पर्यटकांना वापर करता येणार असल्याचं पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यानंतर बोललं जात आहे. असे कोणकोणते देश आहेत जिथे युपीआय पेमेंट वापरलं जातं पाहूयात.

भूतानने युपीआय स्वीकारलं

भूतान : जुलै 2021 पासून भारताचा शेजारी असलेल्या भूतानने युपीआय पेमेंट स्वीकारलं. भीम अ‍ॅपच्या माध्यमातून ही सेवा भूतानमध्ये सुरु झाली.

नेपाळमध्येही युपीआय

नेपाळ : भारताचाच शेजारी असलेल्या नेपाळने याच वर्षी म्हणजे 2023 मध्ये मार्च महिन्यात युपीआय पेमेंटची सेवा देशात सुरु केली. याचा उपयोग भारत आणि नेपाळमध्ये डिजीटल व्यवहार वाढवण्याठीही होणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ ओमानबरोबर करार

ओमान : 2022 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ओमानने युपीआयचा स्वीकार केला. दिल्ली आणि मस्कतमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सेंट्रल बँक ऑफ ओमानमध्ये यासंदर्भात करार झाला आहे.

2022 पासून युएईमध्येही युपीआय

युएई : युनायटेड अरब अमिरातीमध्ये एप्रिल 2022 पासून युपीआय पेमेंट सेवा सुरु करण्यात आली. निओप्ले स्टेशनच्या माध्यमातून भीम युपीआय पेमेंटला सुरुवात करण्यात आली.

2022 पासून फ्रान्समध्येही वापर

फ्रान्स : फ्रान्समध्ये ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या लायरा नेटवर्क आणि एनआयपीएलदरम्यान जून 2022 मध्ये युपीआयसंदर्भात करार झाला. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2022 च्या कार्यक्रमात याची घोषणा केली.

2022 च्या करारानंतर सिंगापूरमध्ये युपीआय

सिंगापूर : सिंगापूरमधील पेनाऊ आणि भारतामधील युपीआयने 2022 साली टायअप केलं. या करारासहीत सिंगापूर हा युपीआय स्वीकारणारा देश झाला आहे.

2022 पासून 'युके'ही वापरतं युपीआय

युनायटेड किंग्डम : ऑगस्ट 2022 मध्ये युनायटेड किंग्डममधील बाजारपेठेत युपीआय पेमेंट स्वीकारलं जाईल अशी घोषणा करण्यात आली. क्यूआर कोड बेस युपीआय पेमेंट युकेमध्ये सुरु झालं.

मलेशियामध्येही युपीआय

मलेशिया : एनपीसीआयने मलेशियामध्ये क्यूआर कोडवर आधारित युपीआय पेमेंटला सुरुवात केली. एकूण 10 देशांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली.

या 10 देशांमध्ये क्यूआर कोडवर आधारित सेवा

मलेशियाबरोबरच या यादीमध्ये थायलंड, फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, कंबोडिया, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांचाही युपीआय क्यूआर बेस पेमेंट सेवा सुरु झालेल्या देशांच्या यादीत समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story