Chanakya Niti: सर्व समस्यांच्या मूळाशी एकच गोष्ट; ताबा मिळवल्यास सुख, संपत्तीचा वर्षाव नक्की

चाणक्य यांनी यासंदर्भातील उल्लेख एका श्लोकामध्ये केला आहे. ते काय म्हणाले आहेत पाहूयात...

कर्मामुळेच आनंद आणि निराशा

चाणक्य म्हणतात की कोणतीही व्यक्ती तिच्या कर्मामुळे दु:ख आणि सुखाचा उपभोग घेत असते.

कर्म कोणत्याही जन्माचे असू शकतात

व्यक्तीला जे चांगले वाईट भोग भोगावे लागतात त्यामागील कर्म आताच्या जन्माचंही असू शकतं किंवा मागच्या जन्माचंही असू शकतं असं चाणक्य सांगतात.

केलेल्या कामातही अडचणी

चाणक्य नीतिच्या 13 व्या अध्यायामधील 15 वा श्लोक मानवाच्या अशा सवयींबद्दल सांगतो ज्यामुळे केलेल्या कामामध्येही अडचणी निर्माण होतात.

...तर संकटामध्येही सुखाचा उपभोग

यात अशा एका समस्येबद्दल चाणक्य यांनी सांगितलं आहे की, ज्यावर ताबा मिळवला तर संकटामध्येही सुखाचा उपभोग घेता येतो.

या गोष्टीने ताबा मिळवला तर...

मात्र याच गोष्टीने एखाद्या व्यक्तीवर ताबा मिळवला तर यश तिच्यापासून फार दूर जातं असं चाणक्य सांगतात.

तो श्लोक कोणता

अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्। जनो दहति संसर्गाद् वनं सगविवर्जनात॥ हाच तो चाणक्य यांचा श्लोक.

सर्व समस्येंचं मूळ कारण एकच गोष्ट

या श्लोकामध्ये चाणक्य यांनी सर्व समस्येंमागील मूळ कारण हे व्यक्तीचं मन हे असतं.

कधीच समाधान नाही

कोणत्याही व्यक्तीचं मन म्हणजेच चित्त हे त्याच्या ताब्यात नसेल तर कितीही सुख आणि संपत्ती असली तरी ती व्यक्ती समाधानी नसते, असं चाणक्य म्हणतात.

...तरी व्यक्ती त्रासलेली असते

मन स्थिर नसेल तर कितीही सुविधा आणि सुख पायाशी लोळण घेत असलं तरी ती व्यक्ती त्रासलेली असते. अशा लोकांची नियोजित कामही अडतात, असं चाणक्य सांगतात.

मनावर ताबा मिळवण्याची क्षमता नसेल तर...

ज्यांच्याकडे मनावर ताबा मिळवण्याची क्षमता नसते असे लोक संपूर्ण कुटुंब एकत्र असलं तरी समाधानी नसतात आणि एकटे असले तरी समाधानी नसतात, असं चाणक्य म्हणतात.

माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story