Ertiga ला टक्कर देणार 'ही' 7 सीटर कार; पेट्रोलशिवाय करणार मोठं अंतर पार
भारतामध्ये सध्या EV चीच चलती असून, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कार या शर्यतीत मागे पडताना दिसत आहेत.
जवळपास प्रत्येक कार उत्पादक कंपनीकडून या विभागात कार निर्मिती केली जात आहे.
या शर्यतीत किआही मागं नाही. येत्या काळात किआकडून Carens EV सह आणखी दोन मॉडेल लाँच केले जाणार आहेत. भारतात कंपनीकडून यंदा EV9 लाँच केली जाणार आहे.
याशिवाय कंपनी मास मार्केट इलेक्ट्रीक कारही लाँच करणार आहे. AY-EV असं या कारचं नाव.
साधारण 2025 मध्ये किआची ही Clavis लाँच केली जाऊ शकते. पण, या कारच्या किमतीसंदर्भात कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
अद्याप या कारचे स्पेसिफिकेशन्स किंवा इतर माहिती समोर आलेली नाही. पण, येत्या काळात ही कार अर्टिगा आणि इनोवा यांच्यातील दरी भरून काढेल हे नक्की.
थोडक्यात अर्टिगा- इनोवाचा विचार करत असाल तर, किआची कार एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरु शकते.