गुजरातविरुद्ध 5 विकेट्स घेणारा मराठमोळा यश ठाकूर आहे तरी कोण?

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला.

एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने 33 धावांनी विजय मिळवला.

लखनौच्या या विजयात 25 वर्षीय यश ठाकूरने मोलाचा वाटा उचलला.

यश ठाकूरने या सामन्यात 3.5 षटके गोलंदाजी करताना 30 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

गुजरातच्या कर्णधार शुभमन गिलला 19 धावांवर त्यानंतर विजय शंकर (१७), राशीद खान (०) आणि राहुल तेवतिया (३०) यांना झेलबाद करत माघारी धाडले.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

एमएस धोनीला विश्वचषक जिंकताना पाहून यश ठाकूरला क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि त्याने विकेटकीपिंग करण्यास सुरूवात केली.

VIEW ALL

Read Next Story