जगाची एकूण लोकसंख्या 800 कोटींहून अधिक आहे. त्यापैकी 67 टक्के लोक इंटरनेट वापरतात.
म्हणजेच जगभरातील 544 कोटी म्हणजेच 5440000000 लोक इंटरनेटचा वापर करतात, असं 'डेटा रिपोर्ट एआय डॉटकॉम'वरील आकडेवारीमध्ये म्हटलं आहे. ही आकडेवारी एप्रिल 2024 ची आहे.
मागील वर्षभरामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच वर्षभरात 17.8 कोटी लोक नव्याने इंटरनेटला जोडले गेले.
जगातील एकूण महिला लोकसंख्येपैकी 64.4 टक्के महिला इंटरनेट वापरतात. पुरुषांचा विचार केला तर हीच आकडेवारी 69.8 टक्के इतकी आहे.
जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांचा विचार केल्यास सरासरी प्रत्येक व्यक्ती दिवसातील 6 तास 35 मिनिटं इंटरनेट वापरतो. यामध्ये कामाच्या वेळेच्या तासांचाही समावेश आहे.
जगातील एकूण इंटरनेट युझर्सपैकी 96.3 टक्के युझर्स हे मोबाईलवरचे आहेत. तर लॅपटॉप किंवा पीसीवरुन नेट वापरणाऱ्यांची संख्या 62.2 टक्के इतकी आहे.
जगभरातील शहरी भागामधील 79.9 टक्के लोक इंटरनेट वापरतात. ग्रामीण भागात हेच प्रमाणे 49.6 टक्के इतकं आहे.