सुकं खोबरं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जात. यामधील पोषक तत्व शरीराच्या अनेक समस्या दूर करतात.
पण सुक खोबऱ्याचं सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकतं. जाणून घ्या कोणी सुकं खोबरं खाऊ नये?
आयुर्वेदिक डॉ. भुवनेश्वरी यांच्या मते, सुक्या नारळामध्ये व्हिटॅमिन-बी 6, कॅल्शियम, लोह आणि अॅंटी-ऑक्सिजडंट मुबलक प्रमाणात असतात. पण जर तुम्हाला पोटदुखी , खोकला किंवा रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असतील तर याचे सेवन करणं टाळा.
जास्त प्रमाणात सुकं खोबर खाल्ल्याने पोटामध्ये गॅस आणि अपचन यासंबंधित समस्या होऊ शकतात.
सुकं खोबऱ्यामध्ये अधिक प्रमाणात कॅलरीज असल्याने वजन झपाट्याने वाढते.
सुकं खोबऱ्याचे सेवन करणं मधुमेहाच्या रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
त्वचेच्या संबंधित समस्या असल्याने सुकं खोबर खाणं टाळावे, यामुळे त्वचेवर खाज आणि पुरळ येऊ शकतात.
त्याचबरोबर सुकं खोबर जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.