कुल्हड पिझ्झा कपल ट्रोल

कुल्हड पिझ्झा कपल सध्या एका एमएमएस व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहे. हा व्हिडिओ त्यांच्या वैयक्तिक क्षणांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे जोडपे ट्रोल झाले.

Sep 26,2023

सोशल मीडियावर लोकांना केले आवाहन

लोकांनी या दोघांवर अनेक वाईट, अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्सही केल्या. दोघांनी या प्रकरणाचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या वेदनाही व्यक्त केल्या आहेत.

पोलिसांत गेले प्रकरण

हे प्रकरण इतके गंभीर बनले आहे की ते पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक केल्याचे म्हटलं जात आहे.

कसे लीक होतात व्हिडीओ?

अनेकांच्या मनात प्रश्न आहे की खाजगी व्हिडिओ किंवा एमएमएस लीक कसे होतात? आणि तुम्ही ते कसे टाळू शकता. (freepik.com)

थर्ड पार्टी अॅप्समधून धोका

आपण फोनवरुन अनेक अॅप डाउनलोड करतो. त्या अॅप्सबद्दल न वाचता अॅक्सेस देतो. त्यामुळे फोनच्या गॅलरीत अॅक्सेस देण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. (freepik.com)

जुन्या फोनमधून डेटा लीक होण्याचा धोका

फोनची विक्री करताना, बरेच युजर नकळत त्यातला डेटा काढत नाही किंवा फोन रीसेट करत नाहीत. त्यामुळे यूजरचा सर्व डेटा फोन खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे जातो. (freepik.com)

क्लाउडमधूनही होतो डेटा लीक

अनेकदा डेटा ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउडवर सेव्ह करतो. बहुतेक व्हिडिओ अशा ठिकाणांहून लीक होतात. याला ठेवलेले पासवर्ड सहज हॅक होतात आणि डेटा लीक होतो. (freepik.com)

डेटा चोरीची ही आहेत चिन्हे

जर कोणी तुमच्या मोबाईलमधून डेटा चोरला तर तुमचा डेटा लवकर संपतो. याशिवाय फोनची बॅटरी झपाट्याने उतरते. फोन स्लो देखील होतो. (freepik.com)

काय काळजी घ्याल?

कोणतेही अॅप डाउनलोड करताना त्याबद्दल काळजीपूर्वक वाचा. तसेच, कोणत्याही अॅपला गॅलरीचा अॅक्सेस देऊ नका. तुमचा महत्त्वाचा डेटा नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करा आणि फोन रिसेट करा. (freepik.com)

VIEW ALL

Read Next Story