भारताला नेस्तनाबूत करणाऱ्या मिस्ट्री स्पिनरची वर्ल्ड कपमध्ये थेट एन्ट्री
वर्ल्ड कपसाठी आता हातावर मोडण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता श्रीलंकेने आपला अंतिम संघ जाहीर केलाय.
दासुन शनाका याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ खेळणार आहे. अशातच आता श्रीलंकंन संघात एका मिस्ट्री स्पिनरची एन्ट्री मिळाली आहे.
आशिया कपमध्ये भारताला नेस्तनाबूत करणाऱ्या दुनिथ वेल्लालागे याची वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री झाली आहे.
वनिंदू हसरंगा वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने आता श्रीलंकने 20 वर्षांचा नवा पर्याय शोधून काढलाय.
दासुन शनाका , कुसल मेंडिस, कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा या फलंदाजांवर संघाचा भार असणार आहे.
चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशन हेमंथा, या तीन ऑलराऊंडर्ससह श्रीलंकेचा संघ मैदानात उतरेल.
महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कसुन राजिथा या तीन प्रमुख गोलंदाजांवर श्रीलंकेचं लक्ष असणार आहे.
मथीशा पाथिराना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका या फास्टर गोलंदाजांची कसोटी भारताच्या मैदानात लागणार आहे.