AI करणार गंभीर आजारांचं निदान

सुंदर पिचाई यांनी दिली माहिती

गुगलच्या एका जुन्या इव्हेंटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी Google AI बद्दल माहिती दिली आहे.

डोळ्याच्या रेटिनाद्वारे शोधणार आजार

सुंदर पिचाई यांनी सांगितले की, गुगल एआयचे सखोल विश्लेषणाचा वापर करून डोळ्याच्या रेटिनाचे स्कॅनिंग करून अनेक आजारांचा शोध घेतला जाईल.

रक्त तपासण्याची गरज नाही

या फिचरचा वापर करुन आजारांचा अंदाज लावता येणार आहे. मात्र त्यासाठी रक्ताचा नमुना किंवा चिरफाड करावी लागणार नाही.

सीटी स्कॅन, एमआरआयची गरज नाही

आता फक्त डोळा स्कॅन करूनच अनेक आजार ओळखता येणार आहेत. ज्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्सरे इत्यादींचा वापर करण्याची गरज नसणार आहे.

कोणत्या आजारांचा शोध लागणार?

रेटिनल स्कॅनमुळे वय, Biological Sex, धूम्रपानाची सवय, मधुमेह, बीएमआय आणि रक्तदाब याविषयी माहिती मिळणार आहे.

दोन पर्याय दिले जाणार

यामध्ये प्रत्येक माहितीमध्ये दोन पर्याय दिले जाणार आहेत, त्यापैकी एकात अंदाज आणि दुसऱ्यामध्ये वास्तविक स्थितीची माहिती मिळणार आहे.

1 डॉक्टर करु शकतो अनेक आजारांचे विश्लेषण

Google AI मुळे फक्त एक डॉक्टर अनेक वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण करू शकेल.

रुग्णाला लवकर मिळणार उपचार

24 तास किंवा 48 तासांनंतर रुग्णाची स्थिती काय असू शकते याचा अंदाज देखील डॉक्टरांना मिळणार आहे. अशा स्थितीत रुग्णावर काय उपचार करायचे आहेत ते लवकर कळू शकेल (सर्व फोटो - Freepik.com)

VIEW ALL

Read Next Story