WhatsApp भारतात कोणत्याही क्षणी बंद होणार? मोदी सरकारने केलं स्पष्ट

Jul 28,2024

WhatsApp प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. दरम्यान, भारतात लवकरच व्हॉट्सअप बंद होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

यादरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलं आहे की, WhatsApp किंवा पालक कंपनी मेटाने यासंदर्भात सरकारला कोणतीही माहिती दिलेली नाही.

काँग्रेस खासदाराने विचारला प्रश्न

काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी प्रश्न विचारला होता की, WhatsApp भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची योजना आखत आहे का? कारण सरकारने त्यांच्याकडे युजर्सच्या डिटेल्स मागितल्या आहेत.

दिल्ली हायकोर्टात दिली होती माहिती

वर्षाच्या सुरुवातील व्हॉट्सअपने दिल्ली हायकोर्टात सांगितलं होतं की, जर सरकारने आपल्याला मेसेजचं इनक्रिप्शन मोडण्यासाठी जबरदस्ती केली तर भारतातील सुविधा बंद करणार.

WhatsApp प्रसिद्ध अॅप असल्याने याच्या माध्यमातून अनेकदा एखाद्याला गंडा घातला जातो. अनेकदा खोट्या बातम्याही पसरवल्या जातात.

मेटानेही आपल्याकडून अनेकदा यासंदर्भातील मोहीम राबवली आहे. ज्याच्या मदतीने ते WhatsApp वरुन व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्या रोखतात.

VIEW ALL

Read Next Story