Car Loan वर कोणती बँक आकारते सर्वात कमी व्याजदर? SBI की BOI, पाहा सर्वोत्तम पर्याय
अनेक बँकांकडून कार लोनवर प्रोसेसिंग फी आकारली जाते. पण, काही बँका मात्र प्रोसेसिंग फी अजिबातच आकारत नाहीत. इंडियन बँक, एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून कार लोनवर कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.
इंडियन बँकेकडून 8.60 टक्क्यांपासून कार लोन मिळतं, तर, एसबीआय 8.65 टक्के व्याजानं कार लोन देते. बँक ऑफ महाराष्ट्र 8.70 टक्के व्याजदरानं कार लोन देते. सेंट्रल बँक ऑफ इंडियासुद्धा याच व्याजानं लोन देते.
कॅनरा आणि युको बँकेमध्ये कार लोन 8.70 टक्के व्याजदरानं सुरु होतं. तर, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेसह बँक ऑफ बडोदा, सीएसबी बँक 8.75 टक्के दरापासून पुढं कार लोन देते.
पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडियासुद्धा 8.75 टक्के व्याजदरानं कार लोन देते.
एचडीएफसी बँक, 8.80 टक्के व्याजदरापासून कार लोन देते. तर, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन ओवरसीज बँक 8.85 टक्क्यांपासून पुढील व्याजदरावर कार लोन देते.
विविध बँका कार लोन देत असताना त्यांच्या अनके अटीशर्तीसुद्धा असतात. त्यामुळं लोन घेताना त्या व्यवस्थित वाचून मगच पुढचा निर्णय घ्या.