डोंगरांमधून धावणार, पाण्यातही तरंगणार; तब्बल 1000 KM रेंज असणारी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच
Sep 27,2023
चीनमधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी बिल्ड युअर ड्रीमने (BYD) आपला प्रीमिअर ब्रँड यांगवैंग (YangWang) अंतर्गत एक जबरदस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही लाँच केली आहे.
या इलेक्ट्रिक एसयुव्हीला कंपनीने Yangwang U8 असं नाव दिलं आहे.
विशेष म्हणजे ही कार फक्त डोंगरभागात धावण्यात सक्षम नाही, तर जहाजाप्रमाणे पाण्यावर तरंगूही शकते.
या एसयुव्हीमध्ये असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत, जे तिला इतक कारच्या तुलनेत अधिक दमदार बनवते.
कंपनीचा दावा आहे की, ही एसयुव्ही पाण्याच्या आत 1 ते 1.4 मीटरपर्यंत बुडलेली असतानाही न थांबता चालवली जाऊ शकते.
ही कार पाण्यावर जवळपास 30 मिनिटं आणि 3 किमीपर्यंत बोटीप्रमाणे तरंगू शकते असं कंपनीचं म्हणणं आहे.
या एसयुव्हीची किंमत 1 कोटी 24 लाख रुपये आहे.
या एसयुव्हीमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर आणि प्लग-इन हायब्रीड सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. जे संयुक्तपणे 1180 hP पॉवर जनरेट करतं.
या गाडीची चाकं एकाच ठिकाणी फिरतील असं फिचर देण्यात आलं आहे. म्हणजेच उभ्या जागी गाडी पार्किंगमध्ये टाकू शकता.
या कारमध्ये 43kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. तसंच 75 लीटरची इंधन टाकीही देण्यात आली आहे. ही कार 1000 किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.
18 मिनिटात बॅटरी 30 ते 80 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.