Without Licence गाडी चालवताना बाबर आझमला पकडलं; दंड म्हणून भरले एवढे पैसे

दुबई मार्गे पाकिस्तानी संघ भारतात येणार

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारतात येण्यासाठी संघाबरोबर रवाना झाला. तो 28 सप्टेंबरला संघासहीत भारतात दाखल होत आहे.

बाबर करणार पाकिस्तानचं नेतृत्व

भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकपमध्ये बाबर पाकिस्तानी संघाचं नेतृत्व करणार आहे.

बाबरविरोधात झाली कारवाई

मात्र पाकिस्तानचा कर्णधार म्हणून भारतामध्ये रवाना होण्याआधी पाकिस्तानी पोलिसांनी बाबरविरोधात वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बाबर आझमची कार पोलिसांनी थांबवल्याचा आणि त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कराची पोलिसांनी केली कारवाई

बाबर आझमविरोधात कराचीमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील वाहतूक पोलिसांनी बाबर आझमला दंड ठोठावला आहे.

पंजाब मोटरवेवर झाली कारवाई

बाबर पंजाब मोटरवेवर आपल्या आलीशान कारमधून प्रवास करत असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

बाबरकडे लायसन्सही नव्हतं

बाबरविरोधात लेन मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच त्याच्याकडे गाडी चालवताना लायसन्सही नव्हतं.

किती दंड झाला हे ही आलं समोर

बाबरला वाहतूक पोलिसांनी दंड केल्याची बातमी समोर आली पण त्याला किती दंड ठोठावला गेला याची माहिती 'जिओ न्यूज'च्या हवाल्याने आता समोर आली आहे.

दंडाची रक्कम किती?

बाबर आझमला वाहतुकीचे 2 नियम मोडल्याप्रकरणी 2 हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भारतीय चलनानुसार ही रक्कम 570 रुपये इतकी होते.

सोशल मीडियावर ट्रोल

वर्ल्डकपआधी इतक्या सामान्य गोष्टीसाठी पोलीस कारवाईला सामोरं जावं लागण्याने बाबरला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story