boAt ची स्मार्ट रिंग

boAt स्मार्ट रिंगला कंपनीने जुलै महिन्यात समोर आणलं होतं. यानंतर आता कंपनीने अधिकृतपणे लाँच केलं आहे. कंपनीने या रिंगची किंमत आणि उपलब्धतेची माहिती दिली आहे.

मेटल आणि सिरेमिकचा वापर

ही साध्या डिझाईनमध्ये असणारी स्मार्ट रिंग आहे. या रिंगमध्ये मेटलसह सिरेमिकचा वापर करण्यात आला आहे. हिचं वजनही जास्त नाही.

किंमत किती?

कंपनीने 8999 रुपयांत ही रिंग लाँच केली आहे. तुम्ही ही रिंग Amazon.in, Flipkart आणि boAt च्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता.

कोणत्या आकारात उपलब्ध?

ही रिंग 7,9 आणि 11 म्हणजेच 17.4mm, 19.15mm आणि 20.85mm डायमीटरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही योग्य ती साईज निवडू शकता.

रिंगचा फायदा काय?

ही स्मार्ट रिंग स्मार्टवॉचप्रमाणे काम करते. ही रिंग पावलं, अंतर मोजते, तसंच कॅलरी बर्नची माहितीही देते.

वॉटरप्रूफ आहे का?

याशिवाय या रिंगमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग फिचरही देण्यात आलं आहे. जे वर्क आऊट करताना तसंच दिवसभर तुमचा हार्ट रेट ट्रॅक करतं. ही रिंग 5 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टंट आहे.

स्मार्टवॉचला पर्याय

यामध्ये तुम्हाला स्पील मॉनिटरिंग आणि Sp02 मॉनिटरिंगचंही फिचर मिळतं. हे फिचर्स स्मार्टवॉटमध्येही आहेत. पण स्मार्टवॉच नेहमी घालून ठेवणं शक्य नाही.

टच कंट्रोल

यामध्ये तुम्हाला टच कंट्रोलही मिळतो. याच्या मदतीने तुम्ही कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल करु शकता. याशिवाय इतरही अनेक फिचर्स वापरु शकता.

वापरायचं कसं?

ही रिंग वापरण्यासाठी तुम्हाला boAt Ring अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्याच्याशी सिंक करताच तुमची रिंग अॅक्टिव्ह होईल. रिंगची बॅटरी 7 दिवस चालेल.

VIEW ALL

Read Next Story