महाराष्ट्रात राखी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधनाला खास नारळाचा गोड पदार्थ बनवला जातो.
नारळीभात, नारळाचे लाडू या व्यतिरिक्त नारळाची बर्फी या हटके आणि झटपट होणारा पदार्थ ट्राय करुन पाहा. अतिशय सोप्या पद्धतीने पाहा नारळाची बर्फी कशी बनवायची.
250 ग्रॅम ओला नारळ किंवा खोबऱ्याचा कीस, फुल क्रीम दूध पाव लीटर, 3 ते 4 कप साखर, साजूक तूप, वेलची, जायफळ पावडर
सर्वप्रथम एका मोठ्या पॅनमध्ये दूध उकळवत ठेवा.बर्फीसाठी शक्यतो फुल क्रिम दूधच वापरा. त्यामुळं खोबऱ्याच्या बर्फीची चव छान येते.
दूध आटवून घेतल्यानंतर त्यात प्रमाणानुसार साखर घाला. दुधात साखर पूर्णपणे विरघळवून घ्या.दूध आणि साखरेचे दाटसर मिश्रण तयार करुन घ्या.
या मिश्रणात वेलची-पावडर, एक चमचा साजूप तूप टाका. त्यानंतर यात खोबऱ्याचा किस घाला. लक्षात ठेवा की खोबऱ्याचा केस थोडा-थोडा घालत जा.
३-४ मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर ढवळत राहा त्यानंतर घट्ट झाल्यावर मिश्रण एका ताटाला साजूप तूप लावून त्यावर टाका व त्याच्या वड्या पाडायला सुरुवात करा.
एकदा का वड्या तयार करुन झाल्या की फ्रिजमध्ये 1 तासासाठी सेट करायला ठेवा