नवे इअरबड्स लॉन्च

मोबाईल इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज सेक्टरमधील आघाडीची कंपनी असलेल्या 'बोट'ने इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस (boAt Immortal 150 TWS) हे इअरबड्स लॉन्च केले आहेत.

इअरबड्सचे फिचर्स

हे इअरबड्सच खास गेम खेळणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. व्हॉइस कमांडपासून अनेक भन्नाट फिचर्स या इअरबड्समध्ये असून याची किंमतही फारच परवडणारी आहे. पाहूयात या इअरबड्सचे फिचर्स....

उत्तम आवाजाचा आनंद

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'मध्ये 10 एमएम ड्युएल बोस बूस्ट ट्राइव्हर्स देण्यात आले आहेत. यामुळे युझर्सला उत्तम आवाजाचा आनंद घेता येईल.

क्वाड मायक्रोफोन्स

फोन कॉलवर नीट ऐकता यावं म्हणून 'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'मध्ये क्वाड मायक्रोफोन्स आणि 'बोट' ईएनएक्स तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. 'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस' हे इअरबड्स गेमिंसाठी 40 एमएसची लो लेटेन्सीला सपोर्ट करतात.

एकदा चार्ज केल्यावर...

एकदा चार्ज केल्यावर हे इअरबड्स 40 तास चालतात. चार्जींगसंदर्भातील टाइप-सी एएसएपी तंत्रज्ञान या इअबड्समध्ये देण्यात आलं आहे.

10 मिनीटं चार्ज केल्यावर...

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस' इअरबड्सच्या चार्जिंग केसची क्षमता 400 एमएच बॅटरीची आहे. 10 मिनिटं चार्जिंग केल्यानंतर हे इअरबड्स 180 मिनिटं काम करतात.

इअरफोन कनेक्ट होण्यासाठी...

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'मध्ये ब्लूटूथ 5.3 व्हर्जन देण्यात आलं आहे. लगेच इअरफोन कनेक्ट होण्यासाठी यामध्ये आयडब्ल्यूपी तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.

आयपीएक्स फोर रेटींग

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'ला स्पॅश आणि स्वेट रेझिस्टंट क्षमतेसंदर्भातील आयपीएक्स फोर रेटींग आहे.

वॉइस असिस्टंटची सोय

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'मध्ये वॉइस असिस्टंटची सोय देण्यात आली आहे. या इअरबड्समध्ये टच कंट्रोलही देण्यात आला आहे.

कुठून घेता येतील?

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस' बोटच्या वेबसाईटबरोबरच फ्लिपकार्टवरुन विकत घेता येईल. काळ्या आणि पांढऱ्या रंगात हे इअरफोन उपलब्ध आहेत.

किंमत किती?

'बोट इमॉर्टल 150 गेमिंग टीडब्ल्यूएस'ची किंमत 1199 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story