416 रुपयांची गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही देशातील सर्वात प्रसिद्ध छोटी बचत योजना आहे.

7.1 टक्के व्याज

देशातील अनेक लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. सरकार पीपीएफवरील जमा रकमेवर 7.1 टक्का व्याज देतं.

पीपीएफ गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय

जर तुम्ही सध्या गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल तर पीपीएफ एक चांगला पर्याय आहे.

जास्तीत जास्त 1.5 लाखांची गुंतवणूक

पीपीएफमध्ये तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करु शकता. एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये या योजनेत गुंतवू शकता.

1.5 लाखापेक्षा जास्त रकमेवर व्याज नाही

गुंतवणूक करताना तुम्ही हफ्त्यात किंवा एकरकमी करु शकता. एका आर्थिक वर्षात 1.5 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास त्यावर व्याज मिळत नाही.

करबचत करण्यासाठीही प्रसिद्ध

करबचत करण्यासाठीही ही योजना चांगली प्रसिद्ध आहे. पीपीएफमध्ये पैसे जमा करत चांगला परतावा मिळवण्यासाह तुम्ही करबचतही मिळवू शकता.

पीपीएफमध्ये कर वाचवू शकता

आयकरातील कलम 80C अंतर्गत पीपीएफमध्ये गुंतवणूक करत तुम्ही कर वाचवू शकता. यासाठी 1.5 लाखांची मर्यादा आहे.

1 कोटी कमावू शकता

415 रुपये रोज म्हणजेच वर्षाला जवळपास 1.5 लाखांची गुंतवणूक करत 25 वर्षात आपण 7.1 टक्के व्याजदराच्या आधारे 1 कोटी रुपये कमावू शकता.

व्याजाच्या रुपात 65 लाख 58 हजार 15 रुपये मिळतील

25 वर्षं 1.5 लाख रुपये जमा करत पीपीएफमध्ये तुम्ही 37 लाख 50 हजारांची गुंतवणूक करु शकता. यानंतर तुम्हाला व्याजाच्या रुपात 65 लाख 58 हजार 15 रुपये मिळतील.

तुम्ही 1 कोटी 3 लाख 8 हजार 15 रुपयांची कमाई

अशाप्रकारे 1.5 लाखांची गुंतवणूक करत 25 वर्षात तुम्ही 1 कोटी 3 लाख 8 हजार 15 रुपये कमावू शकता.

VIEW ALL

Read Next Story