या 4 अभिनेत्रींनी 'आदीपुरुष'मधील जानकी साकारण्यासाठी दिला नकार

क्रिती सेनॉनच्या वाट्याला आलेली ही भूमिका आधी 4 अभिनेत्रींनी नाकारली होती.

क्रितीवर कौतुकाचा वर्षाव

सध्या वादात सापडलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनने साकारलेल्या जानकीच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

क्रिती पहिली पसंती नव्हती

मात्र जानकीच्या भूमिकेसाठी क्रिती ही दिग्दर्शक ओम राऊत यांची पहिल्या पसंतीची अभिनेत्री नव्हती हे तुम्हाला ठाऊक आहे का?

अनेकांकडे करण्यात आली विचारणा...

क्रितीच्या आधी बऱ्याच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्रींकडे या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. या अभिनेत्री कोणत्या होत्या पाहूयात...

अनुष्का शेट्टीला कास्ट करण्याचा मानस

'आदिपुरुष'मध्ये प्रभास हा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. त्यामुळेच त्याच्याबरोबर अनुष्का शेट्टीला कास्ट करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.

अनुष्काने 'आदिपुरुष'ला नकार दिला

प्रभास आणि अनुष्काची जोडी याआधी 'बाहुबली'मध्ये सुपरडुपर हीट ठरली होती. मात्र इतर प्रकल्पांसाठी तारखा राखीव असल्याने अनुष्काने 'आदिपुरुष'ला नकार दिला.

या दाक्षिणात्य अभिनेत्रीकडे केलेली चौकशी

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी यानंतर प्रभासबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

होकार दिला

कीर्तिने या चित्रपटाला आणि जानकीच्या भूमिकेला होकार दिला.

चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करणारच होती पण...

कीर्तिने या चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करणारच होती की तिला एक ऑफर आली.

रजनीकांतबरोबर काम करण्याची...

कीर्तिला सुपरस्टार रजनीकांतबरोबर काम करण्याची ऑफर आल्याने तिने 'आदिपुरुष'ला नकार दिला.

अनुष्का शर्मालाही विचारलं

कीर्ति आणि अनुष्का शेट्टीनंतर 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी अनुष्का शर्मालाही चित्रपटामधील जानकीची भूमिका ऑफर केली होती.

मुलीचं कारण दिलं

मात्र अनुष्काने 'आदिपुरुष'ला नकार दिला. आपल्याला मुलगी वामिकासाठी वेळ द्यायचा आहे असं अनुष्काने सांगितलं.

अनुष्काने आधीच करार केलेला

तसेच 'नेटफ्लिक्स'च्या 'चकदा एक्सप्रेस'साठी अनुष्काने आधीच करार केल्याने तिच्याकडे 'आदिपुरुष'साठी वेळही नव्हता असं सांगितलं जातं.

किआराकडेही विचारणा

'आदिपुरुष'साठी किआरा अडवाणीकडेही विचारणा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

...म्हणून किआराकडेही विचारणा

'शेरशाह' आणि 'जुगजुग जीओ'मधील साध्या, सोज्वळ आणि सरळ मुलीची भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत पडली होती म्हणून किआराकडेही 'आदिपुरुष'संदर्भात विचारणा झालेली.

किआरानेही दिला नकार

मात्र किआरानेही या भूमिकेसाठी नकार दिल्याने अखेर क्रिती सेनॉनला या भूमिकेसाठी निवडण्यात आलं.

VIEW ALL

Read Next Story