तुम्हीही गाडी सुरु करताच AC लावता का? मग आताच बदला 'ही' सवय
Jul 30,2024
जर तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच AC ऑन करत असाल तर तुमची गाडी लवकर खराब होऊ शकते.
पण जर तुमची गाडी नवी असेल आणि तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच एसी ऑन करत असाल तर मात्र ही समस्या येणार नाही.
जर तुम्ही गाडी व्यवस्थित मेंटेन ठेवली असेल तरीही ही समस्या जाणवणार नाही.
पण जर गाडी जुनी असेल आणि ती व्यवस्थित मेंटेन केली नसेल तर गाडी सुरु करताच एसी लावणं समस्या निर्माण करु शकतं.
जर तुम्ही गाडी सुरु केल्यानंतर लगेच एसी ऑन केला तर इंजिनात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला गाडी सुरु करताना त्रास होईल.
जर तुमच्या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असेल तर एसी सहजपणे आपोआप सुरु होईल. मॅन्यूअल सिस्टीममध्ये आधी पंख्याचा वेग कमी करा आणि नंतर हळूहळू वाढवा.
एसी सुरु करताना लाईट्स, रेडिओ बंद ठेवा. जेणेकरुन इंजिनवर अधिक भार पडणार नाही.