अतरंगी हेअरस्टाईल आणि बोलण्याचे व्यंग यामुळे टिकटॉकच्या काळात बारामतीचा सुरज चव्हाण प्रसिद्ध झाला होता.
गुलीगत धोका आणि एसक्यु आरक्यु झेडक्युने सोशल मीडिया गाजवलेल्या सुरजसोबत देखील फ्रॉड झाला होता.
सुरज चव्हाणच्या वडिलांना कॅन्सर झाला होता, त्यांची कॅन्सरची गाठ वाढली, त्यात त्यांचं निधन झालं होतं.
वडिलांच्या निधनानंतर सुरज चव्हाणच्या आईला मानसिक त्रास झाला. त्यांना वेड लागलं होतं, असं सुरज चव्हाण सांगतो.
आईच्या निधनावेळी आजीचं देखील निधन झालं. आजोबांचं आधीच निधन झालं होतं. फक्त आत्या आहे, असंही सुरज सांगतो.
सुरज चव्हाणला एकूण 7 बहिणी होत्या. त्यांना फक्त एवढंच वाटतं की, मी सुधारावं.., असंही सुरज चव्हाणने म्हणतो.
मला लोकांनी लुटलं. मला रिबिन कापायला बोलवायचे तेव्हा मला दिवसाला 80 हजार रुपये मिळायचे, असंही सुरज चव्हाण सांगतो.