दणादण विकली जात आहे 'ही' सेडान

सेडान कार आपल्या खास लूक आणि चांगल्या स्पेससाठी ओळखल्या जातात. SUV गाड्यांचा बाजारात दबदबा असला तरी सेडानची क्रेझ कमी झालेली नाही.

50 टक्के बाजारपेठ ताब्यात

अशाच एका सेडान कारने आपल्या विक्रीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कारने तब्बल 50 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली आहे.

Maruti Dzire

ही कार म्हणजे Maruti Dzire आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या सेडानच्या 25 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली आहे.

किंमत किती?

Maruti Dzire पेट्रोल आणि सीएनजी पावरट्रेनसह एकूण 4 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 6.51 लाखांपासून ते 9.39 लाखांदरम्यान आहे.

इंजिन

या कारमध्ये कंपनीने 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे, जो 90PS ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडलं गेलं आहे.

मायलेज

उत्तम मायलेज मिळत असल्याने सेडान फार लोकप्रिय आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट 22 किमी\लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 31 किमी\किलोग्रॅमचा मायलेज देतं.

7 रंगात उपलब्ध

ही कार एकूण 7 रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 378 लीटरचा बूट स्पेस मिळतो.

फिचर्स

या कारमध्ये अँड्रॉईड ऑटो, अॅप्पल कारप्ले, क्रूझ कंट्रोल आणि ऑटो एलईडी हेडलाइट्ससह 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट देण्यात आला आहे. यामध्ये पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि रेअर एसी वेंटचा पर्याय देण्यात आला आहे.

सेफ्टी फिचर्स

सेफ्टीच्या दृष्टीकोनातून यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रेअर पार्किंग सेन्सॉर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्टसारखे फिचर्स मिळतात.

VIEW ALL

Read Next Story