सतत थकवा जाणवतोय?

सतत थकवा जाणवतोय? 'हे' खाद्यपदार्थ खाणं आताच बंद करा

थकल्यासारखं वाटतं...

थकल्यासारखं वाटतं.... थकवा येतो आजकाल सारखा असं दर दुसरी व्यक्ती हल्ली म्हणताना दिसते. या थकण्यामागचं कारण असतं आपली जीवनशैली. यावरील सर्वात सोपा आणि प्राथमिक उपाय म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं.

प्रोसेस्ड फूड

प्रोसेस्ड फूड अर्थात हवाबंद डब्यांमध्ये असणारे रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या साठवणीच्या पदार्थांचं सेवन केल्यामुळं शरीरातील ताकद झपाट्यानं कमी होते.

सारखरेचं प्रमाण जास्त

सारखरेचं प्रमाण जास्त असणारे पदार्थ तुमच्या शरीरातील ताकद वेगानं वाढवतात. पण, तितक्याच वेगानं हे पदार्थ शरीरातील ताकद कमीही करतात. ज्यामुळं तुम्हाला थकवा जाणवतो.

स्निग्ध पदार्थ

स्निग्ध पदार्थ शरीरासाठी कितीही फायद्याचे असले तरीही त्यांचं प्रमाणात सेवन होणंही तितकंच महत्त्वाचं. त्यामुळं दर दिवशी अती तेलकट पदार्थांचं सेवन टाळा अन्यथा तुम्हाला थकवा जाणवत राहील.

रिफाईंड धान्य

पांढराशुभ्र तांदुळ, पास्ता, व्हाईट ब्रेड अशा पदार्थांमध्ये पोषक तत्त्वं अतिशय कमी असतात. या पदार्थांमुशं शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि थकवा जाणवण्यास सुरुवात होते.

लोहाचं प्रमाण कमी असणारे पदार्थ

शरीरातील सर्व भागांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लोह अतिशय उपयुक्त ठरतं. शरीरात लोहाचं प्रमाण कमी असल्यास अॅनिमिटया, थकवा आणि थकवा जाणवतो. त्यामुळं फास्ट फूड, प्रोसेस्ट मीट असे पदार्थ आणि शीतपेयांचं सेवन टाळा.

VIEW ALL

Read Next Story