प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आणि दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्ददर्शक ऐश्वर्याने पती धनुषबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि धनुषने घटस्फोटासाठी चेन्नी कोर्टाता अर्जही दाखल केला आहे. लवकरच यावर सुनावणी होईल.

ऐश्वर्या आणि धनुषने कलम 13B अंतर्गत कोर्टात अर्ज दाखल केला आहे. परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय या दोघांनी घेतलाय.

2022 मध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं झाल्याची घोषणा केली होती. गेली दोन वर्ष ऐश्वर्या आणि धनुष वेगळे राहात आहेत.

पण त्यावेळी दोघांनी कायदेशीर प्रक्रिया केली नव्हती. मुलांसाठी त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला होता.

ऐश्वर्या आणि धनुषला दोन मुलं आहे. एकाचं नाव यत्र आणि दुसऱ्या मुलाचं नाव लिंगा असं आहे. दोनही मुलं चेन्नईत आई ऐश्वर्या आणि आजोबा रजनीकांत यांच्याबरोबर राहातात.

ऐश्वर्या आणि धनुष यांचं लग्न 2004 मध्ये झालं होतं. तब्बल 18 वर्ष हे दोघंही एकत्र राहात होते. पण त्यानंतर दोघआंनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

VIEW ALL

Read Next Story