येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पुन्हा एकाद बागेश्वरधाममध्ये पोहोचला.

नुकत्याच झालेल्या एशिया कप स्पर्धेत कुलदीपने दमदार कामगिरी केली होती. याच जोरावर त्याला मॅन ऑफ सीरिजचा खिताबही मिळाला.

एशिया कपआधी देखील कुलदीपने बागेश्वरधामला जात आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे आशिर्वाद घेतले होते.

आता विश्वचषक स्पर्धेपूर्वी पुन्हा एकदा कुलदीप यादव कुटुंबासह बागेश्वरधाममध्ये गेला आणि धीरेंद्र शास्त्रींचे आशिर्वाद घेतले

बागेश्ररधाम सरकारच्या अधिकृत सोशल मीडियावर कुलदीप यादव आणि शास्त्रींचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

या फोटोसोबत एक पोस्टही लिहिण्यात आली असून यात पूज्य सरकारचे अतिप्रिय शिष्य कुलदीप यादव बागेश्वर धाम सरकारच्या दर्शनासाठी पोहोचले, असं लिहिलं आहे.

एशिया कपमध्ये मॅन ऑफ द सीरिज खिताब पटकावल्यानंतर कुलदीप पूज्य सरकारचा आशिर्वाद घेण्यासाठी आले, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

कुलदीप यादवने आगामी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी पूज्य सरकारचे आशिर्वाद घेतले, असंही या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story