एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात युजवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. एशिया कपमध्ये चहलला वगळण्यात आलं होतं.

पण चहलची पत्नी धनश्री वर्माला मात्र वनडे वर्ल्ड कपचं तिकिट मिळालं आहे. धनश्री आयसीसीने लाँच केलेल्या वर्ल्ड कपच्या अँथम साँगमध्ये काम केलंय.

वर्ल्ड कपच्या अँथम साँगमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम आहे. त्यांच्याबरोबर या व्हिडिओ धनश्री वर्माही नाचताना दिसत आहे.

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पारंपारीक संगीताला डीजेची जोड देण्यात आली आहे.

रणवीर सिंग आणि धनश्रीचा जान्स चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे. दिल जश्न बोलो असे या अँथम साँगचे बोल आहेत.

धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 मिलिअन फॉलोअर्स आहे.

धनश्री एक प्रोफेशन डान्सर आहे. सोशल मीडियावर ती आपल्या डानस्चे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तिचं युट्यूब चॅनलही आहे.

VIEW ALL

Read Next Story