वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भन्नाट कामगिरी करत आहे.
रोहित शर्माची वैयक्तिक कामगिरीही यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
रोहित शर्मा हा भारताला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाचा पुरावा म्हणून त्याची कर्णधारपदाची आकडेवारी पुरेशी आहे.
सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक होताना दिसत असलं तरी सुरुवातीला रोहित शर्मा कर्णधारपद स्वीकारण्यासाठी तयार नव्हता.
विराट कोहलीने टी-20 मधील कर्णधारपद सोडलं तेव्हा रोहित शर्माला टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याची इच्छा होती अशा अफवा पसल्या.
रोहित आणि विराटमध्ये कर्णधारपदावरुनच वाद असल्याने विराटला कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्याच्या अफवाही क्रिकेट वर्तुळात चांगल्याच चर्चेत होत्या.
मात्र हे सारं घडलं त्यावेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेल्या सौरव गांगुलीने विराट आणि रोहितमधील वाद आणि कर्णधारपदासंदर्भात रोहितचा हव्यास या साऱ्या गोष्टी फेटाळल्या आहेत.
"रोहित शर्मा कर्णधारदपासाठी उत्सुक नव्हता. परिस्थिती अगदी इथपर्यंत गेलेली की मी त्याला थेट सांगितलं तू हो म्हण नाहीतर मी थेट जाऊन घोषणा करेन", असं गांगुलीने कोलकाता टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
"तो एक उत्तम कर्णधार राहिलेला आहे. विराटने पद सोडल्यानंतर संघाचं नेतृत्व करण्यासाठी तोच सर्वोत्तम पर्याय होता," असंही गांगुलीने रोहितवर जबाबदारी सोपवण्यासंदर्भात म्हटलं.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा संघ झाला असून वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीमध्ये भारताने सर्वच्या सर्व सामने जिंकून सेमीफायलन गाठली आहे.