दोन देशांसाठी खेळले क्रिकेट

हे क्रिकेटपटू फाळनीनंतर पाकिस्तानात गेल्यामुळे दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू झाले. भारत 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. तर पाकिस्तानने 1952 मध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

Oct 14,2023

अब्दुल हफीज कारदार

अब्दुल हफीज कारदार यांना पाकिस्तान क्रिकेटचे जनक मानले जाते. त्यांनी भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानसाठी 23 कसोटी सामने खेळले.

अब्दुल हफीज कारदार

कारदार हे पाकिस्तान संघाचे कर्णधारही होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानने कसोटीत भारताचा पराभव केला होता.

गुल मोहम्मद

गुल मोहम्मद यांनी भारतासाठी आठ कसोटी सामने खेळले. मात्र 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानसाठी एक कसोटी सामना खेळला.

गुल मोहम्मद

गुल मोहम्मद त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. 1952 मध्ये त्याने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

आमिर इलाही

आमिर इलाहींनी भारताकडून 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे पदार्पण कसोटी सामना खेळला होता. भारतासाठी हा त्याचा एकमेव कसोटी सामना होता.

आमिर इलाही

आमिर इलाही यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ 6 कसोटी खेळल्या. 1952 मध्ये त्याने भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

VIEW ALL

Read Next Story