बाबर आझमने भारताविरुद्ध रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच पाकिस्तानी कॅप्टन!

अर्धशतक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात बाबर आझमने अर्धशतक ठोकलं.

मोठा रेकॉर्ड

सात फोरच्या मदतीने बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. अर्धशतक पूर्ण झाल्याबरोबरच बाबर आझमने मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे.

पहिला कर्णधार

बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

दोन कर्णधार

बाबरच्या आधी पाकिस्तानच्या दोन कर्णधारांनी आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत.

मिसबाह-उल-हक

मिसबाह-उल-हकने 2015 विश्वचषकात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.

आमिर सोहेल

तर आमिर सोहेलने 1996 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध आयसीसी स्पर्धेत एकमेव अर्धशतक झळकावलं होतं.

VIEW ALL

Read Next Story