आयुषमान, सिंधू, गेल, सचिनही अफगणिस्तानवर इम्प्रेस; काय म्हणाले पाहिलं का?

सर्वांनीच घेतली दखल

अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्याची दखल संपूर्ण जगाने घेतली.

एकच जल्लोष

अफगाणिस्तानने पाकिस्तानला वर्ल्ड कप 2023 मध्ये 8 विकेट्सने पराभूत केलं आणि मैदानात एकच जल्लोष झाला.

क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन क्षेत्राकडूनही कौतुक

अफगाणिस्तानच्या या विजयानंतर भारतीय मनोरंजन क्षेत्रापासून क्रीडा क्षेत्रामधील दिग्गजांनी काय म्हटलंय पाहूयात...

गौतम गंभीरकडून खास पोस्ट

आता हा लिंबू-टिंबू संघ नाही असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

कैफ म्हणतो, परफेक्ट गेम!

मोहम्मद कैफने अफगाणिस्तान परफेक्ट गेम खेळल्याचं म्हणत कौतुक केलं.

युनिव्हर्सल बॉसची खास पोस्ट

ख्रिस गेलनंही केलं अफगाणिस्तानचं अभिनंदन! अनिल कुंबळेंनीही दिली शब्बासकी

क्रिकेटच्या देवाकडूनही कौतुकाची थाप

सचिन तेंडुलकरने केलं अफगाणिस्तानच्या संघाचं कौतुक

शास्त्री गुरुजीही इम्प्रेस

शास्त्री गुरुजीही अफगाणिस्तानवर झाले इम्प्रेस

पी. व्ही. सिंधूचीही प्रतिक्रिया

भारतीय बॅण्डमिंटन पटू पी. व्ही. सिंधूनेही स्वत:चा सामना खेळायला जाण्याआधी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामना पाहिला.

आयुषमान खुरानाचीही प्रतिक्रिया

आयुषमान खुरानानेही भारत आणि पाकिस्तान सामना पाहायला आवडला असता असं म्हटलं आहे पण अफगाणिस्तानचा विजय फारच उत्तम असल्याचंही तो म्हणालाय.

सर्वोत्तम संघ जिंकला

हा संघ फार पुढे जाणार असं कृष्णमचारी श्रींकात यांनी म्हटलंय तर इरफान पठाणने सर्वोत्तम संघ जिंकल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story