5 रन्सने शतक हुकलेल्या विराटला पत्नी अनुष्कानं दिलेलं टोपणनाव पाहिलं का?

विराटच्या खेळीमुळे जिंकला सामना

भारताने न्यूझीलंडविरुद्ध मोहालीच्या मैदानात झालेला सामना विराट कोहलीच्या 96 धावांच्या जोरावर 4 विकेट्स राखून जिंकला.

5 धावांनी शतक हुकलं

या सामन्यात भारताला विजयश्री खेचून आणण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं.

चेस मास्टर म्हणून विराटचा जयघोष

विराटच्या या खेळीमुळे भारताचा विजय सुखकर झाल्याने सोशल मीडियावर विराटवर पुन्हा एकदा चेस मास्टर म्हणजेच धावांचा पाठलाग करण्यात अव्वल म्हणत कौतुकाचा वर्षाव झाला.

अनुष्काने दिलं वेगळं टोपणनाव

मात्र विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या पतीला चेस मास्टरऐवजी दुसरं टोपणनाव दिलं आहे.

3 इन्स्टाग्राम स्टोरी अनुष्काने केल्या शेअर

अनुष्काने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर 3 इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या आहेत.

विराट आऊट झाल्याचा व्हिडीओही केला शेअर

पहिल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्माने विराट 95 वर झेलबाद झाल्याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत "कायमच तुझा अभिमान वाटतो," असं म्हटलं आहे.

दुसऱ्या स्टोरीत काय?

अनुष्काने शेअर केलेल्या दुसऱ्या स्टोरीमध्ये भारताने सामना 4 विकेट्सने जिंकल्याचं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये जडेजा आणि विराट धाव घेतानाचा फोटो दिसतोय.

इन्स्टाग्राम स्टोरी मूळची RCB ची

अनुष्काने शेअर केलेली तिसरी इन्स्टाग्राम स्टोरी मूळची बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सची आहे.

विराटला अनुष्काने दिलं हे टोपणनाव

विराटचा फोटो असलेली बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सची ही स्टोरी शेअर करत अनुष्काने आपल्या पतीला, 'स्ट्रोम चेसर' असं टोपणनाव दिलं आहे.

अनुष्काला नेमकं काय म्हणायचंय

विराट हा वादळाचा पाठलाग करावा त्याप्रमाणे धावांचा पाठलाग करतो, असं अनुष्काला यामधून सूचित करायचं आहे.

VIEW ALL

Read Next Story