IND vs PAK

पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...

वर्ल्ड कपचा थरार

सर्वांना उत्सुकता लागलेल्या वर्ल्ड कपसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा थरार सुरू होणार आहे.

भारत vs पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 14 ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी कॅप्टन रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलंय.

रोहित शर्मा

नुकताच रोहित शर्मा अमेरिकेत गेला होता. त्यावेळी त्याने स्वत:च्या क्लबचं उद्घाटन केलं. त्यावेळी रोहितने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

सर्वात खतरनाक बॉलर कोण?

पाकिस्तानसोबत आता सामने खेळले जाणार आहे, तर तुला पाकिस्तानचा सर्वात खतरनाक बॉलर कोण वाटतो? असा सवाल रोहितला विचारला गेला होता.

मी एकाचं नाव घेतलं तर ..

पाकिस्तानचे सर्व गोलंदाज अप्रतिम आहेत, मी इथं कोणाचंही नाव घेणार नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होतो. मी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं वाईट वाटतं, असं रोहित शर्मा म्हणतो.

सर्व गोलंदाज चांगले

मी दुसर्‍याचे नाव घेतलं तर तिसर्‍याला वाईट वाटेल. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व गोलंदाज चांगले आहेत, असं रोहित शर्मा म्हणतो.

VIEW ALL

Read Next Story