मुंबईत गेल्या दीड महिन्यांपासून पावसाळी आजारांनी कहर केलाय. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसह स्वाईन फ्लूचा फैलाव झाला आहे.


पावसाने उसंत घेतली असली तरी पावसाळी आजारांचं थैमान सुरु आहे. जुलैनंतर ऑगस्टमध्येही आजारांनी डोकं वर काढलं


डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसह आता स्वाईन फ्लूनंही डोकं वर काढलंय. जुलैप्रमाणे ऑगस्टमध्येही रुग्णवाढ कायम आहे.


दूषित पाणी तसंच कीटकांच्या फैलावामुळे आजार बळवतायत, मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.


मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण सर्वाधिक आहे.


पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे होणारी अस्वच्छता आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने पोटाचे विकार झपाट्याने वाढत आहेत.


बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून उलट्या, जुलाब आणि अपचन या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. गेल्या दोन आठवड्यात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं डॉक्टर्स सांगतात.

VIEW ALL

Read Next Story